![]() |
| युवासेना मलकापूर तालुका व शहर पदाधिकारी कार्यकारिणी जाहीर |
जळगाव जा.: दि. ९ एप्रिल २०२४ रोजी युवासेना मलकापूर तालुका व शहर कार्यकारिणी वतीने जळगाव जा. येथे युवासेना जिल्हा प्रमुख श्री. शुभम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. युवा सेना पक्ष वाढीकरिता मलकापूर तालुका प्रमुख पदी सौरभ श्रीधर तायडे तसेच मलकापूर शहर प्रमुख पदी रोहन दिलीपराव सागडे यांची नियुक्ती करण्यात आली सदर नियुक्ती करतेवेळी शिवसेना सह संपर्कप्रमुख मा. दत्ताभाऊ पाटील, उपजिल्हाप्रमुख तुकारामजी काळपांडे, मलकापूर तालुकाप्रमुख दिपक चांभारे पाटील, जळगाव जा. ता. प्र. श्री. गजानन वाघ, वि. सभा संघटक भिमराव पाटील, शहर प्रमुख रमेशजी ताडे, अल्पसंख्यक जिल्हा प्रमुख मुश्ताक भाईजान युवासेना जिल्हा उपप्रमुख विशाल पाटील, युवासेना ता. प्र. जळगाव विशाल ताकोते, चांदभाई कुरेशी व ईतर शिवसैनिक उपस्थित होते.


हम आपके विचारों का स्वागत करते हैं! कृपया अपनी टिप्पणी नीचे दें।