मलकापूर (दि. १७ जून २०२५): सामाजिक कार्यात सातत्य आणि समर्पित सहभाग लक्षात घेता, कुरेशी नगर, मलकापूर येथील समद नजीर कुरेशी यांची अल्पसंख्याक विकास मंडळाच्या बुलडाणा जिल्हाध्यक्षपदी एक वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. ही निवड दिनांक २१/०६/२०२५ ते २१/०६/२०२६ पर्यंत लागू राहील.
श्री. समद कुरेशी हे विविध सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, कृषी, क्रीडा, महिला आणि बालकल्याण क्षेत्रात कार्यरत असून, त्यांच्या योगदानाची दखल घेऊन संस्थापक आणि प्रदेशाध्यक्ष श्री. आसिफ खाटीक यांच्या स्वाक्षरीने नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
नियुक्तीनंतर श्री. कुरेशी यांनी सांगितले की, "मी अल्पसंख्याक समाजाच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून, गरजू आणि दुर्बल घटकांसाठी विविध उपक्रम राबविणार आहे."
या निवडीबद्दल जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना, पत्रकार, आणि नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.


हम आपके विचारों का स्वागत करते हैं! कृपया अपनी टिप्पणी नीचे दें।