बुलडाणा: गेल्या काही दिवसांपासून बुलडाणा जिल्ह्यामध्ये घडलेल्या जबरी चोरी, तसेच | वाहन चोरीच्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेवून, पोलीस अधीक्षक श्री. सुनिल कडासने, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात, श्री. बी. बी. महामुनी यांनी नमुद गुन्ह्याची लवकरात लवकर उकल करून, गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेवून, गुन्ह्यामध्ये गेलेला मुद्देमाल हस्तगत करणेबाबत स्थानिक गुन्हे शाखा - बुलडाणा यांना आदेशीत केले होते. सदर अनुशंगाने पोनि. श्री. अशोक लांडे स्था. गु. शा. बुलडाणा यांनी अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी स्वतंत्र पथके तयार करुन, त्यांना गुन्ह्याचा समांतर तपास करुन, गुन्ह्याची उकल करुन, आरोपीतांचा शोध आणि गेलेला मुद्देमाल हस्तगत करणेबाबत सुचना केल्या. फिर्यादी श्री. विष्णु प्रल्हाद खरा वय ३७ वर्षे, रा. तुळजापूर यांनी रिपोर्ट दिला की, दि. ०३/०५/२०२४ रोजी श्री. गजानन पेट्रोलपंप, सिंदखेड राजा येथून पेट्रोलपंपाची दिवसभराची कॅश घेवून जात असतांना, अझ
गत ०२ ईसमांनी त्यास चालत्या गाडीवर काठी मारुन थांबण्यास सांगीतले. व त्याचे जवळील कॅशची थैली जबरदस्तीने हिसकावून, त्यातील रक्कम १,१९६,१३०/-रुपये घेवून, पळून गेले. नमुद प्रकरणी दि. ०४/०५/२०२४ रोजी पो.स्टे. सिंदखेड राजा येथे गुरनं. ८७/२०२४ कलम ३९४, ३४ भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद होता. तसेच फिर्यादी श्री. किशोर लक्ष्मण वाघमारे वय ४८ वर्षे, रा. सिंदखेड राजा यांनी रिपोर्ट दिला की, दि. १७/०५/२०२४ रोजी त्यांच्या राहत्या घरासमोरुन त्यांची मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर पांढऱ्या रंगाची गाडी क्र. एमएच२८-व्ही-८८०४ कि. अं. ३,७५,००० - रु. ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. रिपोर्टवरून दि. १७/०५/२०२४ रोजी पो.स्टे. सिंदखेड राजा येथे गुरनं. ९३/२०२४ कलम ३७९ भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद होता. भादंवि क. ३९४ मध्ये अटक आरोपी नांव व जप्त मुद्देमाल:- (१) आरोपी आशिष भास्कर मोरे वय १९ वर्षे रा. नसीराबाद सिंदखेड राजा (२) जप्त मुद्देमाल- नगदी १०,९००/-रुपये, (१) भादंवि
क. ३७९ मध्ये जप्त मुद्देमाल:- (१) एक स्विफ्ट डिझयर गाडी किं. ३.७५.०००/- रुपये, गुन्ह्यातील फरारी आरोपीतांचा शोध :- गुन्ह्यातील फरारी आरोपीतांचा शोध घेण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक बुलडाणा यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. श्री. अशोक एन. लांडे प्रभारी अधिकारी स्थागुशा. यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथके तयार करण्यात आले असून, सदर पथक कडून गुन्ह्यामध्ये फरारी आरोपीतांचा कसोशीने शोध घेण्यात येत आहे. मा. पोलीस अधीक्षक श्री. सुनिल कडासने, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात, श्री. बी. बी. महामुनी यांनी जिल्ह्यात होत असलेल्या जबरी चोरी तसेच वाहन चोरीच्या घटनांना अत्यंत गांभीर्याने घेवून, गुन्ह्यातील आरोपींचा शोध तसेच गुन्हयांना प्रतिबंध करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. सदर अनुशंगाने पोनि. श्री. अशोक एन. लांडे, स्थानिक गुन्हे शाखा - बुलडाणा यांनी अधिनस्त पोलीस स्टाफ यांची पथके तयार करून, त्यांना गुन्हे संबंधाने गोपनीय माहिती संकलीत करणे,
अशा गुन्हेगारांची माहिती काढून त्यांचे हालचालींवर लक्ष ठेवणे, तांत्रीक स्वरुपामध्ये तपास करणे, जिल्हा व जिल्हया बाहेरील गुन्हेगारांचा अभिलेख पडताळणे बाबत सुचनात्मक मार्गदर्शन केले. सदर प्रकरणी एकंदर केलेल्या तपासामध्ये गुन्ह्यामध्ये वरील प्रमाणे तसेच फरारी ०२ आरोर्षीचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्या प्रमाणे गोपनीय खबर व तांत्रीक माहितीच्या आधारे वरील प्रमाणे गुन्ह्यांची उकल करून, आरोपीस अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी श्री. सुनिल कडासने पोलीस अधीक्षक बुलडाणा, श्री. अशोक थोरात - अपर पोलीस अधीक्षक खामगांव, श्री बी.बी महामुनी अपर पोलीस अधीक्षक बुलडाणा, यांचे आदेशाने व मार्गदर्शनाखाली, पोनि. श्री. अशोक एन. लांडे, पोउपनि रवि मोरे, पोहेकॉ पंकजकुमार मेहेर, दिगंबर कपाटे, पोकॉ. दिपक वायाळ, चालक पोहेकॉ. समाधान टेकाळे स्थानिक गुन्हे शाखा-बुलडाणा यांचे पथकाने पार पाडली आहे


हम आपके विचारों का स्वागत करते हैं! कृपया अपनी टिप्पणी नीचे दें।