प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेसाठी अर्ज आमंत्रित

Viral news live
Malkapur Today News मुख्य संपादक
0
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेसाठी अर्ज आमंत्रित


बुलडाणा,दि.05(जिमाका): केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत जोडणी नसलेल्या महिलांनी नजीकच्या गॅस एजन्सीमध्ये आवश्यक कागदपत्रे जमा करून, यासाठी लागणार 100 रुपयांचे शुल्क भरून घरगुती गॅस सिलेंडरसाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.  

 अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या पत्रानुसार केंद्र शासनाने प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत 75 लाख अतिरिक्त गॅस जोडण्या मंजूर करण्याचा निर्णय घेतला असून, त्याअनुषंगाने जिल्हा उज्वला समितीही स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे अद्यापही गॅस जोडणी नसलेल्या महिलांनी तात्काळ आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या कोणत्याही गॅस एजन्सीकडे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज करताना राशन कार्ड, आधारकार्ड (कुटुंबातील सर्व व्यक्तीचे 18 वर्षावरील), बँक पासबुक झेरॉक्स (महिला राष्ट्रीयकृत बँकेचे), तीन फोटो (पासपोर्ट), मोबाईल नंबर, केवायसीसाठी अर्जदार स्वतः हजर असावा आणि प्रधान मंत्री उज्वला योजनेसाठी हमीपत्र भरून देणे लाभार्थ्यास आवश्यक आहे.

प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत विस्तारीत योजना 1 यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील, 1 लाख 89 हजार 347 लाभार्थ्यांना लाभ मिळाला असून, प्रधानमंत्री उज्वला योजना विस्तारीत-2 मध्ये आतापर्यंत 8 हजार 694 लाभार्थ्यांना जोडणी देण्यात आली आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी त्वरीत आपल्या जवळच्या कोणत्याही गॅस एजन्सीसोबत संपर्क साधून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0Comments

हम आपके विचारों का स्वागत करते हैं! कृपया अपनी टिप्पणी नीचे दें।

Post a Comment (0)