दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनचा दुसरा वर्धापन दिन उत्सहात साजरा.

Viral news live
Malkapur Today News मुख्य संपादक
0

 


मलकापूर तालुका शिक्षक सह पतसंस्था हॉल येथे दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनच्या वतीने दिव्यांग वर्धापन दिनानिमित्त भव्य हृदयरोग व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .

त्यावेळी सर्वप्रथम माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.




कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मूकबधिर शाळेचे शिक्षक पालकर सर यांनी केले 

दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशन वर्धापन दिनानिमित्त ठेवण्यात आलेल्या हृदय रोग तपासणी व नेत्र तपासणी शिबिराला  प्रमुख उपस्थित म्हणून लाभलेले सुहास उर्फ बंडू चवरे माजी नगरसेवक व तहसीलदार तथा नगरपरिषद मुख्य प्रशासक राजेश सुरळकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲड.साहेबराव मोरे, मनसे शहराध्यक्ष गणेश ठाकूर, उपजिल्हा रुग्णालय मलकापूर चे वैद्यकीय अधीक्षक उंबरकर साहेब,काँग्रेस शहराध्यक्ष राजू पाटील, ओम शांती ऑप्टिकलचे सचिन भंसाली,भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नाना येशी,प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाउपाध्यक्ष अजय टप, साप्ताहिक आपल मलकापूरचे शहर प्रतिनिधी अशोक गाढवे, मूकबधिर शाळेचे मुख्याध्यापक पाटील सर यांची उपस्थिती होती.या वेळी बोलतांना सूर्याच्या तेजाप्रमाणे दिव्यांगाची प्रगती होवो असे विचार बंडू भाऊ चवरे यांनी व्यक्त केले.

 तर सदर शिबिराला शेगाव येथील माऊली  सुपरस्पेशलिस्ट हॉस्पीटलची तज्ञ् टिम मार्फत शिबिरातील मोठ्या प्रमाणात शिबिरार्थींची मोफत इसीजी व हृदय रोगतपासणी करण्यात आली.आणि मोहनराव नारायणा नेत्रालय नांदुराची तज्ञ् टिम यांच्या  मार्फत नेत्र तपासणी करून माफक दरामध्ये चष्मे उपलब्ध करून दिले आहे.

तसेच दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त डॉ.प्रफुल पाटील यांची महाराष्ट्र अध्यक्षपदी तर महाराष्ट्र सचिवपदी गणेश ठाकुर यांची निवड करण्यात आली.

सदर कार्यक्रमाचे आयोजन दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निलेश बाळु चोपडे,सचिव शेख रईस,सहसचिव संतोष गणगे,बुलढाणा जिल्हाध्यक्ष नागेश सुरंगे,जिल्हा सचिव शरद खूपसे, जिल्हा सल्लागार पंकज पाटील,जिल्हासहसचिव राजू रोडे,जिल्हा सोशल मीडिया प्रमुख दत्ता नारखेडे,मलकापूर तालुका अध्यक्ष निलेश अढाव, सचिव रामेश्वर गारमोडे,नांदुरा तालुका अध्यक्ष प्रकाश चोपडे,महिला अध्यक्ष मिरा मुंडे,मोताळा तालुका अध्यक्ष संजय तायडे, उपाध्यक्ष सुरेश कोसे,सदस्य अशोक पवार,अंकित नेमाडे,प्रवीण पाटील,आधी सह दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0Comments

हम आपके विचारों का स्वागत करते हैं! कृपया अपनी टिप्पणी नीचे दें।

Post a Comment (0)