मलकापुर: शेतकऱ्यांचा करोडो रुपयांचा कापूस घेऊन फरार झालेल्या जग्गू डॉनला मलकापूर पोलिसांनी मध्ये प्रदेशातुन केली अटक

Viral news live
Malkapur Today News मुख्य संपादक
0


मलकापूर:- शेतकऱ्यांचा लाखो रुपयांच्या कापसाची रोकड घेऊन फरार झालेल्या आरोपी विरुद्ध अतुल मधुकर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन जणांना अटक करण्यात आले होते मात्र मुख्य आरोपी जग्गू डॉन फरार असून पोलिसांनी तपास चक्र फिरवत जग्गू डॉनला  मध्यप्रदेश मधून अटक केली आहे. ही 21 डिसेंबर रोजी करण्यात आले आहे.
      याबाबत सविस्तर वृत्त असे की जग्गू डॉन या व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडील लाखो क्विंटल कापूस घेऊन फरार झाला होता. विकलेल्या कापसाचे काही रक्कम शेतकऱ्यांना दिले होते मात्र उर्वरित रक्कम साठी जग्गू डॉन शेतकऱ्यांना तारीख पे तारीख देत गंडवत होता. तारीख पे तारीख देत असल्याने शेतकरी त्रस्त झाले होते. याबाबत कुंड येथील शेतकरी अतुल मधुकर पाटील यांनी त्रस्त होऊन पोलीस स्टेशनला तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की
आम्ही 18 एक्कर शेतामध्ये पिकवलेला 153 क्विंटल कापूस बाजारामध्ये कापसाचे भाव 7500/- रु ते 7800/- रु प्रती क्विंटल असतांना आरोपी नं 1 जगन ऊर्फ जगन रामचंद्र नारखेडे 2 शरद विष्णु बोरले दोन्ही रा. भालेगाव ता. मलकापुर 3. राजेश पुंडलिक पाटील रा.कुंड वु यांनी फिर्यादी व त्यांचे गावात राहणारे इतर साक्षीदार शेतकरी यांना विश्वासात घेवुन प्रती क्विंटल 9000/- रु प्रमाणे फिर्यादी यांचा 153 क्विंटल कापूस 13,80,600/- रुचा तसेच साक्षीदार क्रं 2 यांचा 32 क्विंटल 58 किलो किंमती 2,93,220/- रुचा कापूस तसेच साक्षीदार क्रं 3 चा 23 क्विंटल कापूस 2,07,000/- रुचा साक्षीदार क्रं 4 यांचा 09 क्विंटल 21 किलो कापूस किंमती 82,890/- रुचा कापूस साक्षीदार क्रं 5 चा 29 क्विंटल कापुस किमती 2.61,000/- रुचा असा 22,24,710/- रुचा विश्वासाने संगणमत करून खरेदी करुन फिर्यादी यांना फक्त 1,66,650/- रु नगदी देवुन एक महीन्याचे करारावर कापूस घेवून गेले परंतु उर्वरीत बाकी राहीलेले कापसाचे 20,58,060/- रु दिले नाही फिर्यादी व साक्षीदार यांची नमुद आरोपीतांनी संगणमत करुन आर्थीक फसवणुक केली अश्या प्रकारची तक्रार दिल्याने पोस्टेला आरोपीतांविरुद्ध अप नं 600/2023 कलम 420,406,34 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करून सदर गुन्हयात आरोपी राजेश पांडुरंग पाटील 2. शरद विष्णु चोरले यांना दि.01/12/2023 से 00/23 वा अटक करण्यात आली आहे. यातील मुख्य आरोपी जगन रामचंद्र नारखेडे रा. भालेगाव हा फरार असुन त्याचा कसोशीने शोध घेत आहोत. अटक करण्यात आलेल्या आरोपीतांचा सदर गुन्हयाचे तपासकामी पोलीस कस्टडीची आवश्यकता असल्याने त्यांना मा. न्यायालयात हजर केले असता मा न्यायालयाने दोन्ही आरोपीतांचा दि. 04/12/2023 रोजी पावेतो पोलीस कस्टडी रीमांड दिलेला होता. त्यानंतर सदर आरोपींचा पीसीआर मुदत संपल्याने त्यांना पुन्हा मा.न्यायालयात हजर केले असता त्यांना मा. न्यायालयाने जामीनावर मुक्त केले सदर गुन्हयातील आरोपीतांनी मलकापुर तालुका तसेच इतर तालुक्यातुन सुध्दा शेतक-यांचा कापूस घेवुन त्यांना अदयापर्यंत कापसाचे पैसे दिलेले नसल्याने शेतक-यांमध्ये असंतोषाचे वातावरण असुन सदर गुन्हयाचा सखोल व बारकाईने गुन्हयाचा तपास पोलीस अधिक्षक सुनिल कडासने, अप्पार पोलीस अधिक्षक अशोक थोरात उपविपोअसा देवराम गवळी पोलीस निरीक्षक विलास पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि सुरेश रोकडे, पोकों संतोश पेंढारकर, पोका गोपाल तारुळकर हे करीत असतांना

तपास अधिकारी यांनी यातील फरार आरोपी नामे जगन रामचंद्र नारखेडे ता. भालेगाव ता मलकापुर याचे शांधकामी कसोशीने प्रयत्न करीत असतांना तात्रीक विश्लेषणाचे आधारे पोकों गोपाल तारुळकर यांनी नमुद आरोपीतांचे तपास अधिकारी यांनी प्राप्त करून दिलेले मोबाईल क्रमाकाचे सीडीआर एसडीआर व टॉवर लोकेशन प्राप्त करणेकरीता सायबर बुलढाणा यांना पोका संतोष पेंढारकर यांनी पत्रव्यवहार केला होता त्याबाबत सायवर बुलडाणा येथुन आम्हांला सदर आरोपीचे शोधकामी दि. 19/12/2023 रोजी रात्रीचे सुमारास सकारात्मक माहीती प्राप्त झाल्याने म तात्काळ आरोपी शोधकामी मथुरा हमीरा हाउस नं 17 मोहतारा, व्हीलेज गाव मुसामुंडी ता. बजाक, जि.दिडोरी राज्य मध्यप्रदेश येथे जाऊन सदर आरोपी सोबत त्याचा सहकारी पृथ्वीराज तायडे रा.भालेगाव हाही मिळून आल्याने त्यांना सदर गुन्हात रात्री उशीरा आम्ही गोरखपुर राज्य मध्यप्रदेश येथुन ताब्यात घेऊन मलकापूर शहर पोलीस स्टेशन येथे अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून मो. कार जप्त करण्यात आली आहे. सदर आरोपीला न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना 28 डिसेंबर पर्यंत पीसीआर मंजूर केला आहे. 

Post a Comment

0Comments

हम आपके विचारों का स्वागत करते हैं! कृपया अपनी टिप्पणी नीचे दें।

Post a Comment (0)