बुलढाणा, 5 नोव्हेंबर ः पोलिस महासंचालक पदी संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राची पहिली महिला पोलिस महासंचालक होण्याचा मान मिळालेल्या रश्मी शुक्ला यांना निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पदावरून दुर करण्यात आले आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टँपिग प्रकरणी त्यांचे नाव आले होते. त्या अनुशंगाने काँग्रेसकडून त्यांना हटविण्याची मागणी करण्यात आली होती. वर्मा यांचे नियुक्तीनंतर बुलढाणा शहरांमध्ये फटाके फोडण्यात आले. संजय वर्मा यांचे बुलढाण्यातील सुरेश कुलकर्णी यांच्यासोबत कौटुंबिक संबंध आहेत. या पारिवारिक स्नेहातून ते बदली झाल्यानंतरही बुलढाण्यात दोन ते तीन वेळा येऊन गेलेले आहे. श्री कुलकर्णी यांनी सदर नियुक्तीनंतर फटाके फोडून आनंद व्यक्त केला आहे. नवनियुक्त पोलिस महासंचालक संजय वर्मा हे 2002 ते 2004 च्या कालावधीत बुलढाण्याचे पोलिस अधिक्षक राहिले आहे.
बुलढाण्याचे माजी पोलीस अधीक्षक संजय वर्मा बनले पोलीस महासंचालक... MALKAPUR TODAY NEWS
Malkapur Today News मुख्य संपादक
November 05, 2024
0
Tags:

हम आपके विचारों का स्वागत करते हैं! कृपया अपनी टिप्पणी नीचे दें।