बुलढाणा, 16 सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : राहुल गांधी यांची जीभ कापून आणणारा साखर लाखाची बक्षीस दिले जाईल असं वादग्रस्त विधान करणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणी घेऊन काँग्रेसचे दोन आमदार तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे युवा नेते कुणाल चौधरी बुलढाणा पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या आंदोलन करीत आहेत. "गुंड आमदाराला अटक करा", "राहुल गांधी जिंदाबाद", अशी नारेबाजी करीत शेकडो कार्यकर्ते पोलीस ठाणेदारांच्या कॅबिनमध्ये ठिय्या आंदोलन देऊन आहेत. परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर असल्याने या ठिकाणी डीवायएसपी सुधीर पाटील पोहोचले आहेत. आमदार धीरज लिंगाडे, आमदार राजेश एकडे तसेच महाराष्ट्राचे प्रभारी कुणाल चौधरी आंदोलनाची धुरा सांभाळून आहेत. याशिवाय काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ, जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे, ऍडवोकेट जयश्रीताई शेळके, ऍड. संजय राठोड, अरविंद कोलते, विजय अंभोरे, सुनील सपकाळ, ऍड. गणेशसिंग जाधव, स्वातीताई वाकेकर, रामविजय बुरुंगले, ऍड. हरीश रावळ, धनंजय देशमुख, शैलेश खेडकर, अशोक सुरडकर यांच्यासह अनेक नेतेमंडळी ठाण्यात ठाण मांडून आहेत. जोपर्यंत आमदार गायकवाड यांच्या विरोधात दखलपात्र गुन्हा दाखल केला जात नाही, तोपर्यंत ठाण्यातून हलणार नाही, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे.
आ. संजय गायकवाड यांच्याविरोधात काँग्रेसच्या दोन आमदारांसह शेकडो कार्यकर्ते ठाण्यात ठाण मांडून एफआयआर दाखल करण्याची मागणी Malkapur Today
Malkapur Today News मुख्य संपादक
September 16, 2024
0
Tags:

हम आपके विचारों का स्वागत करते हैं! कृपया अपनी टिप्पणी नीचे दें।