![]() |
| आमदार राजेश एकडे यांनी प्रसांगवधान राखून केली तात्काळ अपघातग्रस्तांना मदत... |
( Malkapur Today )
मलकापूर देवधाबा रोडवर भालेगाव पुलाजवळ रणगाव येथील नितीन वसंता दशरथे व तांदुलवाडी येथील नामदेव नारायण किनगे यांची मोटरसायकलची एकमेकांना समोरासमोर धडक बसल्याने ते रोडवर जखमी अवस्थेत पडलेले होते तेवढ्यात त्याच रस्त्याने आपले आमदार राजेश एकडे हे जात होते त्यांनी लगेच आपले वाहन थांबवून सदर इसम जखमी अवस्थेत दिसल्याने लगेच क्षणाचा हि विलंब न करता आमदार राजेश एकडे यांनी स्वतः च्या खाजगी वाहनांने, गाडीने दोन्ही जखमींना स्वतः तात्काळ उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथे उपचारासाठी अँडमिट करून संबंधित डॉ यांच्या सोबत चर्चा करून स्वतः उपस्थित राहून सदर दोन्ही जखमी झालेल्यांना योग्य उपचार उपजिल्हा रुग्णालय येथील संबंधित डॉ यांनी तात्काळ उपचार केले.
यावेळी शहर अध्यक्ष राजुभाऊ पाटील ता अध्यक्ष बंडुभाऊ चौधरी तसेच नागरिक उपस्थित होते.


हम आपके विचारों का स्वागत करते हैं! कृपया अपनी टिप्पणी नीचे दें।