AIMIM बुलढाणा जिल्हाध्यक्ष दानिश शेख च्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन कारवाई न झाल्यास डफडे बजाव आंदोलनाचा निवेदनाद्वारे इशारा...

Viral news live
Malkapur Today News मुख्य संपादक
0
AIMIM बुलढाणा जिल्हाध्यक्ष दानिश शेख च्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन कारवाई न झाल्यास डफडे बजाव आंदोलनाचा निवेदनाद्वारे इशारा...
AIMIM बुलढाणा जिल्हाध्यक्ष दानिश शेख च्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन कारवाई न झाल्यास डफडे बजाव आंदोलनाचा निवेदनाद्वारे इशारा...

आज दिनांक 5 ऑगस्ट २०२४ रोजी AIMIM पक्षाचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष दानिश शेख यांनी उपविभागीय अधिकारी साहेब मलकापूर यांना एका निवेदनाद्वारे कारवाई न झाल्यास डफडे बजाव आंदोलन करण्याचा इशारा दिला आहेत.निवेदनावर नमूद असे आहे की ज्या लोकांचे जन्म दाखले नाही त्या लोकांनी तहसीलदार साहेब यांच्याकडे सर्व कागदपत्रांच्या पुराव्यानिशी अर्ज करावा व त्यावर मा. तहसीलदार साहेब आदेश देऊन संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना जन्म मृत्यूची नोंद घेण्याचे आदेश करतात.असे फेब्रुवारी 2024 अर्ज हजारोच्या संख्येने अर्ज तहसील कार्यालात धूळ खात आहेत.परंतु अद्यापही माननीय तहसीलदार साहेबांनी सह्या न मारल्यामुळे वयोवृद्ध नागरिकांना हेलपाटे सहन करावे लागत आहेत. तसेच शासनाने ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा जास्तीचे पैसे घेऊन शपथपत्र, उत्पन्न चा दाखला, रहवासी दाखला, सर्व लागणारे कागदपत्रे आधार कार्ड, महा-ई-सेवा केंद्र, सेतू,कॉमन सर्विस सेंटर व आधार कार्ड सेंटर संचालकांवर नियमानुसार पैसे न घेता जास्तीचे पैसे घेत आहे त्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या साठी निवेदन देऊन ही कारवाई न होत असल्यामुळे आज रोजी डफडे बजाव आंदोलनाचा ईशारा देण्यात आला आहे.ज्या गावाची परवानगी आहेत त्या ठिकाणी दुकान चालवावे.तसेच अवैधरित्या सुरू असलेले बायोडिझेलपंप, वाहनांमध्ये टाकण्यात येणारे गॅस, इतर सर्व अवैध धंद्दे तहसीलदारांच्या आशीर्वादाने सुरू असल्यामुळे तात्काळ कारवाई न झाल्यास दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी तहसील कार्यालयासमोर डबडे बजाव आंदोलन करण्यात येईल असा एका निवेदनाद्वारे इशारा देण्यात आलेला आहे.

Post a Comment

0Comments

हम आपके विचारों का स्वागत करते हैं! कृपया अपनी टिप्पणी नीचे दें।

Post a Comment (0)