![]() |
| महविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या ऋणातून उतराई होणे शक्य नाही: श्रीराम दयाराम पाटील |
आज दिनांक 16 मे 2024 रोजी महाविकास आघाडीच्या सर्वपक्षीय नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या च्या प्रत्यक्ष भेटी गाठी घेण्यासाठी माहविकास आघाडीचे रावेर मतदार संघाचे अधिकृत उमेदवार मा श्रीराम जी दयाराम पाटील हे दुपारी 4 वाजता भ्रातृ मण्डल मलकापूर येथे आले असता त्यांनी हे भावनिक उदगार व्यक्त केले. निवडणूक काळात प्रचाराला कमी वेळ मिळाल्या मुळे मी प्रत्यक्ष सर्व महविकास आघाडीच्या नेते पदाधिकारी कार्यकर्ते मंडळी ला व्यक्तिगत भेट देऊ शकलो नाही परंतु असे असताना सुद्धा आपण सर्वांनी ही संविधान आणि लोकशाही वाचविण्याची लढाई आपली स्वतःची व्यक्तिगत लढाई समजून आपले राष्ट्रीय नेते मुकुलजी वासनिक साहेब आणि मलकापूर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार साहेब विकास पुरुष मा राजेशजी एकडे साहेब यांच्या नेतृत्वात दिवस रात्र आहे त्या संसाधनामध्ये लढविली आणि माझ्या विजया करीता परिश्रम घेतले त्या बद्दल मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो व आपले नाते भविष्यात सुद्धा असेच प्रेमाचे विश्वासाचे कायम राहील अशी हमी देतो ,आपल्या या ऋणातून मी कधीही उतराई होणे शक्य नाही असे भावनिक उदगार मा श्रीराम जी पाटील यांनी कार्यकर्त्या समोर व्यक्त केले.
यावेळी बोलताना मलकापूर चे आमदार विकास पुरुष मा राजेश जी एकडे यांनी सर्व महविकास आघाडीच्या नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनती मुळे मलकापूर मतदार संघातून कमीत कमी पंधरा हजार मतांची लीड श्रीराम पाटील यांना नक्कीच मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
या प्रसंगी भाराका नेते डॉ अरविंद जी कोलते ,अँड साहेबराव मोरे ,महिला जिल्हाध्यक्ष मंगलाताई पाटील शहर काँग्रेस अध्यक्ष राजुभाऊ पाटील तालुका काँग्रेस अध्यक्ष बंडू भाऊ चौधरी राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष अरुण भाऊ अग्रवाल माजी नगराध्यक्ष नारूसेठ निहलानी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस शिरीष भाऊ डोरले नगर सेवक अनिल गांधी डॉ सलीम युसुफ खा अँड आनंद कुमार शर्मा ,अँड दिलीप बगाडे गोविंद रहाटे अशोक मराठे विनय काळे दिलीप गोळीवाले रामराव तळेकर संभाजी शिर्के सिद्धांत इंगळे विलास खर्चे यांसह महाविकास आघाडी चे असंख्य नेते पदाधिकारी नेते कार्यकर्ते उपस्थित होते.


हम आपके विचारों का स्वागत करते हैं! कृपया अपनी टिप्पणी नीचे दें।