मतदार जागृती रॅलीने दुमदुमला जिल्हा मतदान करून लोकशाहीचा उत्सव साजरा करा – जिल्हाधिकारी

Viral news live
Malkapur Today News मुख्य संपादक
0

 
मतदार जागृती रॅलीने दुमदुमला जिल्हा
मतदान करून लोकशाहीचा उत्सव साजरा करा – जिल्हाधिकारी

बुलडाणा, दि. 4 : वैश्विक ओळख असलेल्या भारतासारख्या लोकशाही राष्ट्रात निवडणूक प्रक्रिया व मतदानाच्या अधिकाराचे अनन्यसाधारण महत्व लक्षात घेता २०१९ च्या लोकसभा निवडणूकीच्या तुलनेत २६ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मतांचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून व्यापक प्रयत्न केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून संपूर्ण जिल्ह्यात ग्रामीण आणि शहरी भागात निघालेल्या मतदार जागृती रॅलीने जिल्हा दुमदुमला आहे.

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनातर्फे युवक, नवमतदार, महिला, दिव्यांग, जेष्ठ नागरिक आणि सर्वसाधारण मतदार यांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुनियोजित मतदार शिक्षण व निवडणूक सहभाग कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून प्रत्येक कुटुंबापर्यंत मतदानाचा संदेश पोहचविण्यासाठी व मतदार जाणीव जागृतीच्या उद्देशाने जिल्हाभरात सर्वदूर शालेय विद्यार्थी, शिक्षक व नागरिक यांच्या सहभागाने मतदार जागृती रॅलींचे विविध ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत जिल्ह्याचा मतांचा टक्का वाढविण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यातील सुमारे १८ हजार नवमतदार, सोळा हजार दिव्यांग मतदार, 30 हजार ज्येष्ठ मतदार इत्यादीसह संपूर्ण मतदारांना दृष्टीक्षेपात ठेऊन मतदार जाणीव जागृतीसाठी व्यापक प्रयत्न केल्या जात आहेत. यापार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा स्वीप नोडल अधिकारी बी. एम. मोहन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील १३ तालुक्यात सुनियोजित मतदार शिक्षण व निवडणूक सहभाग कार्यक्रमासाठी पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांना तालुका नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.   प्रत्येक मताचे मुल्य लोकशाही महत्त्वपूर्ण असून प्रत्येक सुजाण नागरिकाने आपला मताधिकार बजावून हा लोकशाहीचा उत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

मतदार जनजागृती रॅलीसोबतच इतर वैविध्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन प्रशासनातर्फे केले जात आहे.

Post a Comment

0Comments

हम आपके विचारों का स्वागत करते हैं! कृपया अपनी टिप्पणी नीचे दें।

Post a Comment (0)