बुलडाणा लोकसभा: भाजपाची धोरणे सर्वसामान्यासह देशासाठी घातक : रेखाताई ठाकूर सामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी वसंतराव मगर यांना लोकसभेत पाठवा BJP's policies are dangerous for the country including the common man: Rekhatai Thakur Send Vasantrao Magar to the Lok Sabha to raise the voice of the common man

Viral news live
Malkapur Today News मुख्य संपादक
0
बुलडाणा लोकसभा: भाजपाची धोरणे सर्वसामान्यासह देशासाठी घातक : रेखाताई ठाकूर * सामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी वसंतराव मगर यांना लोकसभेत पाठवा BJP's policies are dangerous for the country including the common man: Rekhatai Thakur Send Vasantrao Magar to the Lok Sabha to raise the voice of the common man
बुलडाणा लोकसभा: भाजपाची धोरणे सर्वसामान्यासह देशासाठी घातक : रेखाताई ठाकूर * सामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी वसंतराव मगर यांना लोकसभेत पाठवा BJP's policies are dangerous for the country including the common man: Rekhatai Thakur Send Vasantrao Magar to the Lok Sabha to raise the voice of the common man

बुलडाणा : सत्ताधारी भारतीय जनता पार्टी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धोरणे, मनसुबे सर्वसामान्य वंचित घटकासह देशासाठी घातक असल्याचे अभ्यासु प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीच्या 

प्रदेशाध्यक्ष Rekhatai Thakur रेखाताई ठाकूर यांनी येथे केले. यामुळे भाजपला सत्तेतून पायउतार करून समाजातील वंचित शोषित घटक सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी वसंतराव मगर यांना लोकसभेत पाठवा, असे आवाहनही श्रीमती ठाकूर यांनी यावेळी केले.

Buldhana Lok Sabha बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंतराव मगर यांच्या प्रचारार्थ बुलडाणा-चिखली मार्गावरील हॉटेल नर्मदा येथे सभा पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदी, कृषी माल आयात निर्यात धोरण, यासारखी धोरणे घातक ठरली. यामुळे नवीन व्यावसायिक सर्वसामान्य श्रमजीवी , कामगार, कष्टकरी, गृहिणी शोषित वंचितांची, दैना झाली. सध्या मूठभर उद्योग पती सोडले तर सर्वच समाज घटक त्रस्त आहेत. हे चित्र बदलण्यासाठी सर्व जाती धर्मांना पाठबळ व लोकसभेत उमेदवारी देणाऱ्या वंचित आघाडीला भरभरून मतदान करून श्रद्धेय ऍड बाळासाहेब आंबेडकर, वसंतराव मगर या उमेदवारांना लोकसभेत पाठवा, असे आवाहन त्यांनी आपल्या अभ्यासू भाषणाच्या समारोपात केले. 

वंचितचे उमेदवार मगर म्हणाले की, बुलडाण्यात प्रस्थापित विरुद्ध विस्थापित, धनदांडगे विरुद्ध गरीब अशी लढत आहे. आपण विजयी झालो तर जालना, खामगाव, अकोट, खंडवा रेल्वेमार्ग, वैनगंगा ते नळगंगा नदी जोड प्रकल्प, मोठे उद्योग आणणे, बेरोजगारी दूर करणे याला प्राधान्य देऊ असे आश्वासन मगर यांनी दिले. सभेचे संचलन अमर इंगळे यांनी केले. 

सभेला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष सतीश पवार, सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हाध्यक्ष मोहित दामोदर, वंचितचे शहराध्यक्ष मिलिंद वानखेडे, बाळा राऊत आदी उपस्थित होते.


Tag

Buldhana Lok Sabha

Rekhatai Thakur

buldhana lok sabha election

buldhana india

buldhana lok sabha constituency

mla buldhana

buldhana khasdar

buldhana zp election 2017 results

buldhana lok sabha election 2024 date

after how many years lok sabha elections are held

elections for lok sabha are held every

Tags:

Post a Comment

0Comments

हम आपके विचारों का स्वागत करते हैं! कृपया अपनी टिप्पणी नीचे दें।

Post a Comment (0)