![]() |
| प्रधानमंत्री कार्यालय वसुली कार्यालय झाले आहे : Balasaheb Ambedkar |
Nandura : प्रधानमंत्री कार्यालय मानवतेचे कार्यालय होण्याऐवजी ईडी, सीबीआय व जीएसटी च्या माध्यमांतून वसुली करणारे कार्यालय बनले आहे, असा घाणघाती आरोप Vanchit Bahujan Alliance वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केला.
बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील Vanchit Bahujan Alliance वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार वसंतराव मगर यांच्या प्रचारार्थ नांदुरा नजीकच्या एसपीएम कॉलेज परिसरात बुधवारी रात्री साडेनऊ वाजता प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी टीकेची झोड उठविली
ते म्हणाले की, आज देशातील सीमा सुरक्षित नसून अरुणाचल प्रदेश व लडाख मध्ये चीन आपल्या छाताडावर येऊन बसला आहे. सैन्यदल हमला करायला तयार असतांना पंतप्रधान त्यावर कुठलाही निर्णय न घेता गप्प आहेत . त्यांचे कारण चायनाने मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रोल बाॅन्ड खरेदी करून भारतीय जनता पक्षाचा फायदा केला आहे. आज सत्तेवर असलेले सरकार हे वसुली करणारे असून तुम्ही यांना मतदान करणार की, जातीला मतदान करणार आहात असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना केला. त्यावर आपण सेक्युलर पक्षाला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. वंचीत बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून दिल्यास एनआरसी व सीएए दोन्ही कायदे हद्दपार करण्यात येतील असेही ते पुढे म्हणाले. देशात हिंदु धोक्यात आहे. असा अपप्रचार करण्यात येत आहे. प्रत्यक्षात राज्यसभेच्या रेकॉर्ड वरून सन २०१४ ते २०२४ पर्यंत १७ लाख हिंदूं कुटुंबांनी देश सोडला असुन देशाचे नागरिकत्वही सोडले आहे. प्रत्यक्षात १९५० पासून २०१४ पर्यंत ७ हजार हिंदू कुटुंबांनी देश सोडला व देशाचे नागरिकत्व सोडला त्यांचे कारण कौटुंबिक आहे. परंतु जे २०१४ नंतर सोडून गेले ते मात्र सरकारच्या त्रासामुळे गेल्याचे सांगितले. Vanchit Bahujan Alliance वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मगर याना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
Vanchit Bahujan Alliance वंचित बहुजन आघाडी चे बुलडाणा जिल्हा अध्यक्ष देवाभाऊ हिवराळे यांच्यअध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी शमिभा पाटील जळगाव जिल्हा अध्यक्ष, शरद वसतकार, जिल्हा समन्वयक डॉ.राजकुमार सोनेकर, डॉ.अनिल अंमलकार, बाळासाहेब दामोदर इत्यादींनी मार्गदर्शन केले. वंचित बहुजन आघाडीचे केंद्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नांदुरा येथे झालेल्या पहिल्या सभेला लोकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून ऐतिहासिक ठरविली. प्रास्तविक जिल्हा महिला अध्यक्ष विशाखा सावंग तर आभार प्रदर्शन रावेर मतदार संघाचे उमेदवार संजय ब्राह्मणे यांनी केले. आयोजनाकरिता भगवान इंगळे, अजाबराव वाघोदे, संजय इंगळे ,अशांत रणीत, अजबराव गाडे, अतुल दांडगे, निलेश वाघ, मिलिंद जाधव, गजानन वाघ, सिमा चव्हाण (सरपंच), प्रविण भिडे यांनी परिश्रम घेतले.
Tag..
Vanchit Bahujan Alliance
वंचित बहुजन आघाडी
Nandura
Balasaheb Ambedkar
बाळासाहेब आंबेडकर



हम आपके विचारों का स्वागत करते हैं! कृपया अपनी टिप्पणी नीचे दें।