८० हजाराचे सोने असलेले पाकीट दोन महिलांनी गायब केल्याची पो.स्टे.ला तक्रार; गुन्हा दाखल

Viral news live
Malkapur Today News मुख्य संपादक
0

८० हजाराचे सोने असलेले पाकीट दोन महिलांनी गायब केल्याची पो.स्टे.ला तक्रार; गुन्हा दाखल


मलकापूर (प्रतिनिधी) - सोने खरेदी करूण पोथ गाठवण्यास गेले असता अज्ञात दोन महिलांनी पिशवीमधील अंदाजे ८० हजार रूपयांचे सोने ठेवलेले पाकीट गायब केल्याची तक्रार मलकापूर शहर पो.स्टे. ला १८ मार्च रोजी दिल्यावरून पोलिसांनी अज्ञात महिलांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविता श्रीराम काकडे रा. श्रीरामनगर मलकापूर यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्या त्यांच्या वहिनी रेखा चिम व प्रतिभा चिम रा. पंतनगर यांचेसोबत १७ मार्च रोजी दुपारी जुनी सोन्याची पोथ गाठवण्यासाठी तसेच नवीन सोने खरेदीसाठी शनि मंदिराजवळील भडगावकर ज्वेलर्स येथे गेले होते. यावेळी तेथून ४ ग्रॅम

६६० मिली. किं. ३१६९० रू. व सोन्याचे पेंडॉल ३ ग्रॅम १० मिली किं. २२५१० असे खरेदी केले. तसेच जवळ असलेली जुनी सोन्याची २ ४ ग्रॅम पोथ अंदाजे किं. २६ हजार रू. असे गाठवण्यासाठी गेले. मात्र गाठवण्याचे अधिक पैसे सांगितल्याने परत आले. दरम्यान

दोन महिलांनी माझ्याकडे गाठवण्याचे किती पैसे सांगितले

याबाबत विचारपूस केली. मी भडगावकर यांचे ज्वेलर्सकडे परत गेली असता त्या महिला माझ्या मागे आल्या. मी तेथून माझा भाऊ संदीप चिम यांच्या कापडाच्या दुकानात गेले असता जवळील पिशवीतील सोने ठेवलेले पाकीट गायब झाले असल्याचे माझ्या निदर्शनात आले. त्यानंतर मी दागिन्यांचा शोध घेतला परंतु मिळून आले नाही. माझा पाठलाग करणाऱ्या त्या दोन महिलांनीच माझ्या पिशवीतील सोने ठेवलेले पाकीट गायब केल्याची तक्रार सविता काकडे यांनी दिल्यावरून

पोलिसांनी अप.नं. ११८ / २०२४ कलम ३७९, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

0Comments

हम आपके विचारों का स्वागत करते हैं! कृपया अपनी टिप्पणी नीचे दें।

Post a Comment (0)