![]() |
सैलानीत पोलीस चौकीसह २८ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित; ठाणेदार राजपूत यांचा पुढाकार
गुन्हेगारांनो सावधान, तुमच्यावर आता 'तिसरा डोळ्या'ची नजर
सैलानीबाबा दर्गा सर्वधर्मिय लाखो भाविकांचे श्रध्दास्थान आहे. वर्षाच्या बाराही महिने या ठिकाणी भाविकांची दर्शन किंवा नवस फेडण्यासाठी गर्दी असते. याच गर्दीचा फायदा काही गुन्हेगार घेत असुन त्यांनी सैलानी परिसराला आपले आश्रयस्थान बनविले आहे. गुन्हेगारांचा हा 'कावा' ओळखून गुन्हे व गुन्हेगारीला प्रतिबंध घालण्यासाठी रायपूर ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी सैलानी परिसरात २८ सीसीटीव्ही कॅमेरे लावून पोलिसांचा 'तिसरा डोळा' कार्यन्वित केला आहे. सोबतच पोलीस अधिक्षकांच्या पुढाकारातून या ठिकाणी पोलीस चौकीचे निर्माण करण्यात येत असल्याने सैलनी दर्गा व परिसरावर आता पोलिसांची करडी नजर राहणार आहे.
सैलानीबाबा हे सर्वधर्मियांचे श्रध्दास्थान नव्हेतर राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतिक आहे. त्यामुळे देश-विदेशातील लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी तसेच नवस फेडण्यासाठी येतात.
होळीच्या दिवसी या ठिकाणी देशातील सगळ्यात मोठी नारळाची होळी पेटवून यात्रेस प्रारंभ होतो. लाखोच्या संख्येणे यात्रेकरु या ठिकाणी येतात. कमी अधीक महिनाभर चालणाऱ्या या यात्रेत
भाविक मुक्कामी असतात. उसळलेल्या गर्दीचा गैरफायदा घेऊन गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकंही या ठिकाणी आश्रयाला येतात. छोटे-मोठे गुन्हे करुन सहज पोबाराही करतात. ही बाब हेरुन भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातून रायपूर ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी सैलानीमध्ये पोलीस चौकीचे निर्माण करण्यात येवून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत पोलीस अधीक्षक सुनील कडासणे यांच्याकडे प्रस्ताव सादर केला
सैलानी उभारण्यात आलेल्या पोलीस चौकीत एक अधिकारी व दोन अंमलदारांची कायमस्वरुपी नेमणूक करण्यात आली आहे. तर याच चौकीत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना नियंत्रित करणारी यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यामुळे दैनदिन कामकाजासह दर्गाच नव्हेतर संपूर्ण सैलानी परिसरावर पोलिसांनी २४ तास नजर असणार आहे.
होता. पोलीस अधीक्षक कडासणे यांनी जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या ही बाब लक्षात आणून दिली. तसेच पाठपुरावा करुन त्यांच्याकडून जिल्हा नियोजन निधीतून २८ सीसीटीव्ही कॅमेरे, ३ ऑफिस कंटेनर चौकी व साहित्यासाठी निधी उपलब्ध करुन घेतला. नव्हेतर दर्गा परिसर, वाघजाळी बाबा, झिरा परिसरासह
अन्य ठिकाणी कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले. तसेच पोलीस चौकीही सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे यात्रा कालावधीतच नाही, तर बाराही महिने सैलानीवी रायपूर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. यामुळे भाविकांना सुरक्षा प्रदान होण्यासह गुन्हेगारी कारवायांना आळा बसण्यास मदत होणार आहे.


हम आपके विचारों का स्वागत करते हैं! कृपया अपनी टिप्पणी नीचे दें।