श्रावणबाळ, संजय गांधी निराधार व दिव्यांग ५ टक्के निधीबाबत दिव्यांग मल्टीपर्पज फाऊंडेशनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Viral news live
Malkapur Today News मुख्य संपादक
0
श्रावणबाळ, संजय गांधी निराधार व दिव्यांग ५ टक्के निधीबाबत दिव्यांग मल्टीपर्पज फाऊंडेशनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

मलकापूर (malkapur today)- श्रवणबाळ,संजय गांधी निराधार योजना व दिव्यांग ५ टक्के निधीबाबत व आधार कार्ड बायत निर्माण झालेल्या समस्या तात्काळ सोडविण्यात याव्या अशी मागणी दिव्यांग मल्टीपर्पज़ फाउंडेशन, मलकापूरचे संस्थापक अध्यक्ष निलेश बाळू चोपडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे तहसीलदार मलकापूर यांचे मार्फत एका निवेदनाद्वारे करण्यात आली.

दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, गेल्या चार महिन्यापासून श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना व संजय गांधी योजनेचे बऱ्याचशा लाभार्थ्यांची अनुदान रखडले असून त्याकरीता तहसील कार्यालय मलकापूर येथून लाभार्थ्यांना आधारकार्ड अपडेट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु बहुतांश लाभार्थ्यांच्या आवण बाळ योजनेच्या केसेस हथा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दाखल्यावरून मंजूर झालेल्या आहे. त्या लोकांकडे कोणत्याही प्रकारची जन्माचे दाखले किंवा शाळेचे दाखले उपलब्ध नाहीत. कारण त्यांची जन्माची नोंद कुठे केलेली नसून ते शाळा सुध्दा शिकलेले नाहीत. त्यामुळेच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दाखल्यानुसार त्यांची श्रवणबाळ योजनेची प्रकरणे मंजूर करण्यात आलेली आहेत. तसेच

अन्यथा तहसील कार्यालय आवारात भीक मांगो आंदोलनाचा इशारा

त्यांना गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून श्रावणबाळ योजनेचे अनुदान प्राप्त होत आहे. परंतु आताच्या नवीन नियमानुसार श्रवणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना आधार कार्डवर जन्मतारीख अपडेट केल्याशिवाय अनुदान मिळणार नाही अशा सूचना तहसील कार्यालयातून देण्यात येत आहे. याबाबत शासनाने ज्या लोकांकडे जन्मदाखले किंवा शाळेचे दाखले नाहीत अशा लाभाथ्यर्थ्यांकरिता आधारकार्ड अपडेटची स्वतंत्र वेगळी यंत्रणा राबवावी व काहीतरी उपाययोजना करावी. तसेच मार्च २०२५ या वर्षात ज्या संजय गांधी श्रावणबाळ


योजनेच्या लाभाथ्यांच्या केसेस मंजूर करण्यात आलेल्या आहेत. त्यांना मूळ कागदपत्रे कार्यालयात महा-ई-सेवा केंद्र चालकांमार्फत सादर केल्याशिवाय त्यांची नोंदणी करण्यात येणार नाही असे सांगण्यात येत आहे परंतु मूळ कागदपत्रे गहाळ झाल्यास याला कोण जबाबदार राहील असा प्रश्न उपस्थित होत आहे. तरी आपण या सर्व प्रकरणाची योग्य ती चौकशी करून श्रवणबाळ संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना योग्य तो न्याय दयावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच काही लाभार्थी असे आहे की त्याचे खाते आधार


सीडिंग असून सुध्दा लाभार्थाच्या खात्यामध्ये अद्यापपर्यंत अनुदान जमा होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. डिसेंबर महिन्यापर्यंत संगणकीय प्रणाली योग्य रीतीने काम करत होती त्यानुसार अनुदान मिळत होते पण जानेवारी २०२५ पासून असे काय झाले की असे उत्तरे मिळत आहे की तुमच्या इतर बँक खात्यामध्ये अनुदान जमा झाले असेल ते तपासून पहा तरी याची चौकशी करण्यात यावी.


त्याचप्रमाणे नगर परिषद मलकापूर अंतर्गत दिव्यांगाचा गेल्या आर्थिक २०२४ चा ५ टक्के राखीव निधी अद्यापपर्यंत लवकरच वाटप करण्यात यावा. अन्यथा दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनतर्फे मलकापूर तहसील कार्यालयाच्या आवारात भीक मांगो आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनाच्या शेवटी देण्यात आला.


निवेदनावर निलेश बाळु चोपडे, पंकज प्रभाकर मोरे, गणेशसिंह मदनसिंह बयस, संतोष रामभाऊ गणगे, शे. रईस शे. रशिद, निलेश अढाव, शरद खुपसे, दत्ता नारखेडे, रहेमान शहा, रविंद्र जंगले, सचिन बनारे, अंकित नेमाडे, विजय सावळे, रामनाथ इंगळे, प्रविण पाटील, रामधन खोडके, अनिल निकम यांचेसह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0Comments

हम आपके विचारों का स्वागत करते हैं! कृपया अपनी टिप्पणी नीचे दें।

Post a Comment (0)