![]() |
| शैलेंद्र नामदेव इंगळे यांचे हृदयविकाराने दुःखद निधन |
मोताळा तालुक्यातील जहागीरपूर येथील रहिवासी शैलेंद्र नामदेव इंगळे (वय 50) यांचे मंगळवार, दिनांक 21 जानेवारी 2025 रोजी तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व वडील असा परिवार आहे. वडिलांच्या डोळ्यांसमोरच पुत्राचा असा अकाली मृत्यू होणे ही अतिशय हृदयद्रावक घटना असून, इंगळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांच्या अंतिम संस्कारासाठी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या शैलेंद्र इंगळे यांच्या अचानक जाण्याने मित्रपरिवार व गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली!


हम आपके विचारों का स्वागत करते हैं! कृपया अपनी टिप्पणी नीचे दें।