मलकापूर विधानसभा मतदारसंघातील चक्रीवादळ व अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या... आमदार राजेश एकडे

Viral news live
Malkapur Today News मुख्य संपादक
0

मलकापूर विधानसभा मतदारसंघातील चक्रीवादळ व अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या... आमदार राजेश एकडे


चक्रीवादळ व अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या मलकापूर विधानसभा मतदारसंघातील नुकसानग्रस्तांना विशेष मदत मिळावी, शहर पोलीस स्टेशन मुख्य् इमारत बांधकामासाठी निधी मंजूर करण्यात यावा तसेच विश्रामगृह बीओटी तत्त्वावर निर्मितीस मंजुरात द्यावी अशा महत्त्वपूर्ण मागण्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे आमदार राजेश एकडे यांनी २९ मे रोजी बुलढाणा येथे केल्या आहे.
         २६ मे २०२४ रोजी माझ्या मलकापूर मतदार संघात मलकापूर व नांदुरा शहरांसह तालुक्यातील अनेक गावांना जोरदार वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाचा तडाखा बसला आहे. आम्ही या भागाची पाहणी केली असुन यामध्ये अनेक घरांची पडझड झाली आहे, घरावरील टिनपत्रे उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. घरातील धान्य, जिवनावश्यक वस्तु वादळामध्ये उडून गेल्या आहेत. तसेच जनावरांच्या गोठ्यावरील टिनपत्रे, चारा यासह शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळामुळे झाडे उन्मळून विद्युत तारांवर पडल्याने १००० विद्युत पोल क्षती ग्रस्त झाले आहेत. तसेच विजेच्या तारा तुटून विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने जनावरांना पिण्याचे पाणी न मिळाल्याने जनावरे मृत आहेत, अजुनही अनेक गावे अंधारात आहेत.चक्रीवादळ व अवकाळी पावसाने मलकापूर तालुक्यातील रविंद्र विक्रम निकम, निवृत्ती गन्साराम इंगळे हे मृत पावले आहेत, तर १५ जनावरे दगावली असुन ११० घरांचे पुर्णतः तर २२८६ घरांचे अशतः नुकसान झाले आहे.तसेच आतापर्यंतच्या प्राप्त झालेल्या अहवालानुसार नांदुरा तालुक्यातील ५०० घरे अंशतः बाधीत झाले असून १२ गावे पुर्णतः बाधित झाली आहेत, तसेच जनावरेही दगावलेली आहेत. महसूल विभागाकडून अद्यापही पंचनामे सुरु आहेत. यामध्ये नुकसानग्रस्तांच्या संख्येत अजुनही वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तरी चक्रीवादळ व अवकाळी पावसाने नुकसान झालेल्यांना आपणाकडून विशेष मदत देण्यात यावी पोलीस स्टेशन मलकापूर शहर मुख्य् इमारत बांधकामासाठी निधी मंजूर करण्यात यावा.
       तसेच वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात पोलीस अधिक्षक, इमारतीची टिनपत्रे उडाली असुन बुलढाणा यांच्या अधिपत्याखालील शहर पोलीस स्टेशनच्या मुख्य् दैनंदिन कामकाज ताडपत्रतीचे तंबु उभारुन त्यातुन सुरु आहे. आम्ही यापूर्वीसुध्दा मलकापूर शहर पोलीस स्टेशन इमारत व शासकीय निवासस्थान बांधकामाबाबत शासनाकडे सतत पाठपुरावा केलेला आहे. मलकापूर शहर पोलीस स्टेशन हे अतिशय संवेदनशील आहे. या इमारतीचे बांधकाम इंग्रजकालीन असुन आज रोजी इमारत शिकस्त झाल्याने पुर्णतः पडझड झालेली आहे. सदर इमारत पोलीस कर्मचाऱ्यांसाठी धोकादायक असल्याचे झालेल्या वादळामुळे दिसून आले आहे. अशा परिस्थीतीतही पोलीस कर्मचारी आपला जीव धोक्यात घालुन त्या ठिकाणी आपले कर्तव्य पार पाडत आहेत. तरी मलकापूर शहर पोलीस स्टेशन इमारत बांधकामासाठी १५ कोटी रुपये मंजुर करण्यात यावेत त्याचप्रमाणे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात मलकापूर विश्रामगृहाच्या इमारतीवरील टिनपत्रे पुर्णपणे उडून गेली असुन इमारतीची पडझड झाली आहे.मलकापूर हे विदर्भाचे प्रवेशव्दार असुन या ठिकाणी व्यापारी, अधिकारी, कर्मचारी , लोकप्रतिनिधी यांची नेहमी ये-जा असते तरी त्यांच्या निवासाकरीता विश्रामगृह महत्वाचे आहे.अस्तित्वातील विश्रामगृहाची जागा अत्यंत मोक्याच्या ठिकाणी शहराच्या मध्यभागी असून व्यावसायिक दृष्ट्या सुद्धा महत्त्वाची आहे तरी सदर ठिकाणी बि.ओ.टी. तत्त्वावर बांधकाम केल्यास शासनास मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा सुद्धा होणार आहे तरी नवीन आताच्या दरानुसार सदरील प्रस्ताव मागविण्यात येवून येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात मंजुर करण्यात यावा अशा तिन महत्वपूर्ण मागण्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे आमदार राजेश एकडे यांनी केल्या

Post a Comment

0Comments

हम आपके विचारों का स्वागत करते हैं! कृपया अपनी टिप्पणी नीचे दें।

Post a Comment (0)