नांदुरा चांदुर बिस्वा येथील गुजरी चौकात सार्वजनिक ठिकाणी वरली मटका जुगार खेळणाऱ्या जुगाऱ्यावर २० मे २०२४ रोजी कारवाई करण्यात आली. याबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चांदुरबिस्वा येथील गौरी चौकात पंचा समक्ष धाड टाकली. यावेळी आरोपी सार्वजनिक ठिकाणी लोकांकडून पैसे स्वीकारून कागदावर वरली मटका चिठ्ठया लिहून वरली मटका नावाचा जुगार खेळताना व खेळवितांना मिळून आला. आरोपी विलास उत्तम काटोने (वय ५०) रा. चांदुर बिस्वा याच्याकडून वरली मटका जुगाराचे नगदी २३० रुपये, एक डॉट पॅन्ट ५ रुपये, वरली मटका आकडे लिहिलेली चिट्ठी असा एकूण २३५ रुपयाचा जुगार माल जप्त करण्यात आला. पोलिसांनी आरोपी विरुद्ध महाराष्ट्र जुगार बंदी कायदा कलम १२ (अ) खाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोहेकॉ अमोल खोंदील करीत आहेत.


हम आपके विचारों का स्वागत करते हैं! कृपया अपनी टिप्पणी नीचे दें।