समृद्धी महामार्गावर ट्रक व आयशरचा भीषण अपघात,एक ठार तर चार जण जखमी

Viral news live
Malkapur Today News मुख्य संपादक
0
दुसरबीड

दुसरबीड :- आज दि 11/4 2024 रोजी सकाळी 8.50वा दरम्यान नागपूर कॅरीडोर चैनेज न. 313.2 वर आयशर क्रमांक एम एच 04 केएफ 8740 चे चालक रणजीत गौतम वय 40 रा सुलतानपूर उत्तर प्रदेश हे 

आपले वाहन ट्रकच्या लेनवर चालवीत असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणारा ट्रक क्रमांक एम एच 48 सी क्यू 4828 चे चालक रणजीत कुमार मुकेश कुमार वय 50 सुलतानपूर ,उत्तर प्रदेश याने समोरील जेट विमान साठी लागणाऱे ऑइल घेऊन जाणाऱ्या आयशरला पाठीमागून जोरदार धडक दिली यामध्ये आयशर हे 

सिमेंट पुलाच्या कठड्याला लागून उलटे फिरून पलटी झाले. यामध्ये आयशर चालक रणजीत गौतम वय 40 रा सुलतानपूर हा जागीच ठार झाला. व त्यामध्ये बसलेले इतर तीन व्यक्ती 1)संतोष छोटूलाल हरिजन वय 25 मुंबई. उरण 2) महिंद्र गौतम वय 50. 3) सोनू गौतम वय 30 दोन्ही राहणार सुलतानपूर उत्तर प्रदेश असे जखमी झाले. 

व आयशर चे अक्षरशः चुराडा झाला सदर दोन्ही वाहने महामार्गाच्या मधोमध असल्याने तात्काळ महामार्ग पोलीस चे पीएसआय गजानन उज्जैनकर पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल काळुसे, 

निवृत्ती सानप व महाराष्ट्र सुरक्षा बल चे अमोल जाधव, उमेश नागरे ,जयकुमार राठोड यांनी वाहतूक थांबवून जखमी यांना क्यू आर व्ही टीम चे हनुमंत जायभाये ,श्रीरामे यांचे मदतीने जखमींना वाहना बाहेर काढून मदत केली व जखमी यांना तात्काळ औषध उपचार कामी डॉक्टर वैभव बोराडे, तायडे व चालक शिंदे ,

पडघान यांनी औषध उपचार कामी सिंदखेड राजा ग्रा.रु.येथे घेऊन गेले. घटना स्थळी API संदीप इंगळे बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पाटील सा.पोलीस कर्मचारी सरदार ,जैवळ हे पुढील कारवाई करीत आहे. अपघात ग्रस्त दोन्ही वाहने दुसरबीड टोलनाका येथे सुरक्षित ठिकाणी लावण्यात आले आहे

Tag....

Latest Buldhana News in Marathi | Buldhana Local News Updates | ताज्या ...

#MALKAPURTODAY

Post a Comment

0Comments

हम आपके विचारों का स्वागत करते हैं! कृपया अपनी टिप्पणी नीचे दें।

Post a Comment (0)