मलकापूर रेल्वे स्थानकावर दिसली मोबाईल चोरांची दहशत हवाई गोळीबाराने रामवाडी हादरले

Viral news live
Malkapur Today News मुख्य संपादक
0
मलकापूर रेल्वे स्थानकावर दिसली मोबाईल चोरांची दहशत हवाई गोळीबाराने रामवाडी हादरले

Buldhana मलकापूरः तिघांचा रेल्वेस्थानकात मोबाइल चोरीचा प्रयत्न करणे, रेल्वे पोलिसांना गुंगारा देत प्लॅटफॉर्मवरून उड्या मारतानाच फायरिंग करण्याचा प्रकार घडला. एखाद्या चित्रपटातील कथानकात दिसणारी ही घटना मलकापुरात दिवसाध्वळया घडली. रविवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेत काहींनी हवेत गोळी झाडून पोबारा केला. त्यावेळी लगतचा रामवाडी परिसर चांगलाच हादरला.रेल्वेस्थानकात रविवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास नांदेड- श्रीगंगानगर सुपरफास्ट एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर दाखल झाली. त्यावेळी तिथे बसलेल्या तिघांपैकी एकाने रेल्वे प्रवाशाचा मोबाइल चोरीचा

प्रयत्न केला. परंतु, नागरिकांच्या सतर्कतेमुळे तो प्रयत्न हाणून पडला. पण, गर्दी झाल्याने रेल्वे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच त्या तिघांनी रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म १ वरून उड्या घेत नजीकच्या रामवाडी परिसरात पळ काढला. मात्र, हा प्रकार रामवाडीतील अॅड. नीलेश तायडे व इतरांच्या लक्षात येताच लोकांनी गर्दी केली. त्यामुळे तिघांपैकी एकाने हवेत गोळी झाडली. त्यामुळे आपसूकच नागरिक बॅकफूटवर आले अन् तीच संधी साधून तिघे नांदुरा रस्त्याकडे पळाले पोलिस येण्यापूर्वीच तिघे फरार रेल्वेस्थानकातून बाहेर पडल्यानंतर

गोळीबार करणाऱ्या आरोपीपैकी एक चालत्या ऑटोरिक्षात बसला.

त्यापाठोपाठ दोघे जण बसले अन् पाहता- पाहता तिघांनी पोबारा केला. लोकांनी तत्काळ ही माहिती पोलिसांना कळविली. त्यानुसार पोलिस निरीक्षक अनिल गोपाल व पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले, पण तोपर्यंत तिघेही फरार झाले होते. याप्रकरणी पोलिस निरीक्षक अनिल गोपाल यांनी तत्काळ पोलिस उपनिरीक्षक ईश्वर वरगे यांच्या नेतृत्वात डीबी पथकाला नांदुरा रस्त्यावर चौकशीसाठी रवाना केले. पोलिस त्या तिघांचा शोध घेत आहेत. हवेत झाडलेल्या गोळीचे कव्हर पोलिसांनी जप्त केले आहे.

Post a Comment

0Comments

हम आपके विचारों का स्वागत करते हैं! कृपया अपनी टिप्पणी नीचे दें।

Post a Comment (0)