बुलडाणा :आज लोकसभा निवडणुकीसाठी सहा उमेदवारांचे अर्ज दाखल

Viral news live
Malkapur Today News मुख्य संपादक
0
आज लोकसभा निवडणुकीसाठी सहा उमेदवारांचे अर्ज दाखल

बुलडाणा, दि. 2 : बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज 6  उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. उमेदवारांनी त्यांचे नामांकन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याकडे सादर केले. दरम्यान दि. 4 एप्रिल ही नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.
आज बुलडाणा लोकसभा निवडणुकीसाठी 4 जणांनी 6 अर्जाची उचल केली. दरम्यान आज सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. आतापर्यंत 53 जणांनी 124 अर्जाची उचली केली आहे. तर 8 उमेदवारांनी 14 नामांकन अर्ज दाखल केले आहेत.
आज प्रतापराव गणपतराव जाधव – शिवसेना, रेखा कैलास पोफळकर – अपक्ष, प्रताप पंढरीनाथ पाटील - बहुजन मुक्ती पक्ष, रविकांत चंद्रदास तुपकर - अपक्ष, असलम शहा हसन शहा - महाराष्ट्र विकास आघाडी, मोहंमद हसन इनामदार - मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

लोकसभा निवडणुकीची अधिसूचना दि. 28 मार्च रोजी प्रसिद्ध झाली आहे. इच्छुकांना दि. 4 एप्रिलपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी नामांकन अर्ज सादर करता येणार आहे. दाखल करण्यात आलेल्या नामनिर्देशन पत्रांची दि. 5 एप्रिल रोजी छाननी करण्यात येणार आहे. तसेच दि. 8 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार असून दि. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. उमेदवारांना कोरे नामांकन पत्र देणे, अनामत रक्कम भरणे तसेच अर्ज दाखल करण्यापूर्वी छाननीची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच उमेदवारांना ऑनलाईन नामांकन अर्ज दाखल करता येणार आहे. नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी दि. 4 एप्रिलपर्यंत वेळ असला तरी वेळेवर धावपळ टाळण्यासाठी इच्छुकांनी वेळेच्या आत अर्ज दाखल करावेत, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे


Post a Comment

0Comments

हम आपके विचारों का स्वागत करते हैं! कृपया अपनी टिप्पणी नीचे दें।

Post a Comment (0)