![]() |
AIMIM चे वतीने मुख्य अधिकारी न. प. मलकापूर व मलकापूर पोलीस स्टेशनला निवेदन |
आज दिनांक 21/02/2024 बुधवार रोजी AIMIM चे जिल्हाध्यक्ष दानिश शेख यांचे नेतृत्वात मलकापूर येथे मुख्य अधिकारी न. प. मलकापूर व मा.ठाणेदार साहेब मलकापूर शहर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आला या निवेदनात दिनांक 25/02/2024 रोजी आयोजित मुस्लिम समाजाचे धार्मिक *सबे ए बारात* या कार्यक्रमाचे आयोजन वल्ली चौक मलकापूर येथील पुष्पहार अगरबत्ती धार्मिक विधीचे साहित्याचे दुकान रात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याकरिता निवेदन देण्यात आला मुस्लिम समाजाच्या धार्मिक महोत्सव असलेल्या *सबे ए बारात* या कार्यक्रमानिमित्त या परिसरातील लोक हे परंपरेनुसार धार्मिक विधी करण्याकरिता मदार टेकडी येथील बेरी कब्रस्तान, राज मोहल्ला येथील कब्रस्तान, मनियार बिरादरी कब्रस्तान, अहमदशाह पुरा कब्रस्तान, ईदगाह प्लॉट कब्रस्तान या ठिकाणी जात असतात सदर विधीच्या कार्यक्रम हा नमाज नंतर रात्री 12 ते उशिरापर्यंत राहतो त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात कब्रस्तान मध्ये वर्दळ राहते त्यामुळे या भागात धार्मिक विधी पार पडताना या करिता मोठ्या प्रमाणात फुले पुष्पहार अगरबत्ती व इतर धार्मिक विधीचे साहित्य हे नागरिकांना साठी उपलब्ध व्हावे याकरिता धार्मिक विधी साहित्य विक्रीचे दुकान हे सुरू राहणे आवश्यक गरजेचे आहे करिता मुख्य अधिकारी न. प. मलकापूर व मलकापूर पोलीस स्टेशन आपल्या स्तरावरून या दुकानांना रात्री 12 वाजता पर्यंत सुरू ठेवण्या करिता परवानगी मिळावी करिता निवेदन सादर केला आहे.
या वेळी उपस्थित एडवोकेट इमरान रशीद खान मलकापूर शहराध्यक्ष, इमरान मौलाना,बशा भाई,नदीम भाई,आसिफ पत्रकार ,जावेद भाई ,इतर


हम आपके विचारों का स्वागत करते हैं! कृपया अपनी टिप्पणी नीचे दें।