आज दिनांक 30 जानेवारी 2024 मंगळवार रोजी मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती अध्यक्ष यांचे आदेशानुसार विदर्भ संघटक मा. दानिश शेख यांचे नेतृत्वात मलकापूर येथे मा.मुख्यमंत्री साहेब व मा.मागासवर्गीय आयोग महाराष्ट्र राज्य पुणे अध्यक्ष यांना मलकापूर उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत निवेदन देण्यात आला या निवेदनात 23 जानेवारी पासून मराठा व खुल्या प्रभागातील नागरिकांना संरक्षण सुरू केलेले आहे त्यामध्ये मुस्लिम समाजाच्या सुद्धा समावेश आहे परंतु आपल्या तयार केलेला संरक्षणाचे ॲप मध्ये मुस्लिम समाजाच्या खालील प्रमाणे त्रुट्या निर्देशात येत आहे
1)धर्माचे कॉलम इस्लाम उपलब्ध नाही
2) मुस्लिम समाज या निशाणीवर क्लिक केलेला असता मुस्लिम मधील ओबीसी जातीच्या उल्लेख समोर येते
3) सदर या ऑप्शन क्लिक केले असता व त्यामध्ये मुस्लिम असा उल्लेख केला असता ॲप बंद पडते
4) संरक्षण करणारे कर्मचारी फक्त मराठा समाजाच्या उल्लेख करीत असल्याने मुस्लिम समाजाच्या नागरिकांचे सर्वे केले जात नाही
5) काही कर्मचारी मुस्लिम समाजाचे फक्त नाव व मोबाईल नंबर घेतात
६) मुस्लिम समाजामध्ये संरक्षण बाबत जनजागृती झाली नसल्याने व अचानकपणे संरक्षण सुरू झाल्याने मुस्लिम समाजाचे नागरिकांनी गोंधळ उडू शकत निर्माण होते आहे
या विषयावरील सर्व बाबी व मागण्याच्या गंभीरता पूर्वक विचार व्हावा अन्यथा संरक्षण कोणत्याही प्रकारच्या अर्थ होणार नाही वरील बाबी ह्या संरक्षण त्रुटीने गंभीर आहे तरी आपण योग्य प्रकारचे निर्णय घ्यावा असे नमूद केले आहे यावेळी मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याचे विदर्भ संघटक दानिश शेख, बबलू भाई टेलर, बिलाल भाई, अनिस अहमद, शाहरुख खान,आसिफ खान व इतर पदाधिकारी उपस्थित होते....
मराठा आरक्षण सर्वेक्षण सोबतच मुस्लिम समाजाची ही सर्वेक्षण करा
Malkapur Today News मुख्य संपादक
January 30, 2024
0
Tags:


हम आपके विचारों का स्वागत करते हैं! कृपया अपनी टिप्पणी नीचे दें।