![]() |
| माणूसकी फाऊंडेशनच्या वतीने महाराष्ट्राची रणरागिणी पुरस्कार वितरण सोहळा संपन्न |
: माणुसकी मल्टिपर्पज फाऊंडेशन आयोजित राज्यस्तरीय महाराष्ट्राची रणरागिणी पुरस्कार 2024 रविवार दि.7 जानेवारी 2024 रोजी जनता कला वाणिज्य महाविद्यालय मलकापूर येथे पार पडला. कार्यक्रमाचे उदघाटक अध्यक्ष म्हणून सेवातीर्थ धाम वृद्धाश्रम चे प्रमुख श्री वसंत विठ्ठल पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून मलकापूर पोलीस स्टेशनचे. सहाय्यक पोलीस निरीक्षक स्मिता म्हसाये मॅडम, ओम शांती सेवा समितीचे अध्यक्ष सचिनभाऊ भंन्साली उपस्थित होते. या वेळी संपूर्ण महाराष्ट्रात मधून आरोग्य, साहित्य, सामाजिक, शिक्षण, कृषी ,कला ,उद्योग, तसेच विविध क्षेत्रातील आलेल्या नामांकित महिलांना त्यांच्या कार्यानुसार पुरस्कार बहाल करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक माणूसकी फाऊंडेशन च्या बुलडाणा जिल्हा महिला सचिव सौ संगीता बढे मॅडम यांनी केले .महिला पुरस्कार कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माणूसकी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विवेक राजापुरे, महिला जिल्हा अध्यक्ष सौ. सारिका मिरासे, राज्य महिला सचिव अश्विनी जामोदे , अंश श्रीवास, अक्षय राजापुरे ,सागर सुग्रमकर, यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाला, महिला पुरस्कारर्थी तसेच बऱ्याच लोकांची उपस्थिती होती

.jpg)
हम आपके विचारों का स्वागत करते हैं! कृपया अपनी टिप्पणी नीचे दें।