![]() |
मलकापूर राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर असलेल्या ओपन स्पेसमध्ये अतिक्रमण करून कब्जा केलेल्यांविरूध्द कारवाई करून
अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी मोहम्मद अशपाक अब्दुल अजीज जमादार यांनी उपविभागीय अधिकारी मलकापूर यांच्याकडे १८ डिसेंबर रोजी एका निवदेनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी मलकापूर यांचे कार्यालयातून मौजे फातेमा नगर राष्ट्रीय महामार्ग नं.६ मलकापूर येथे सव्र्हे नं. २७/३ मधील ओपन स्पेस मधील ए १२१०.७५ चौ.मी. हा ओपन स्पेस असून त्या जागेवर अतिक्रमण करून कब्जा केलेला आहे. मंडळ अधिकारी मलकापूर व तलाठी मलकापूर भाग १ यांनी संबंधीत ८ लोकांना अतिक्रमण हटविण्यासाठी नियमानुसार कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर अतिक्रमण धारकांना नोटीसेस बजावूनही त्यांनी अतिक्रमण काढले नाही. तरी सदरचे अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे, अशी मागणी मोहम्मद अशपाक अब्दुल अजीज जमादार यांनी केली आहे


हम आपके विचारों का स्वागत करते हैं! कृपया अपनी टिप्पणी नीचे दें।